(+91) 020-66455100

Frequently Asked Questions ( STROKE)

Frequently Asked Questions

1. What is a stroke?

Answer: The two forms of stroke are ischemic – blockage of a blood vessel supplying the brain, and hemorrhagic – bleeding into or around the brain. In an ischemic stroke, a blood clot blocks or plugs a blood vessel or artery in the brain. About 80 percent of all strokes are ischemic. In a hemorrhagic stroke, a blood vessel in the brain breaks and bleeds into the brain. About 20 percent of strokes are hemorrhagic.

2. What happens when you have a stroke?

Answer: When a stroke occurs, the blood supply to part of the brain is suddenly interrupted. Brain cells die when they no longer receive oxygen and nutrients from the blood or there is sudden bleeding into or around the brain.

3. What are the symptoms of stroke?

Answer: Symptoms include sudden numbness or weakness, especially on one side of the body; sudden confusion or trouble speaking or understanding speech; sudden trouble seeing in one or both eyes; sudden trouble with walking, dizziness, or loss of balance or coordination; or sudden severe headache with no known cause. An easy was to remember the symptoms is F.A.S.T

 • Facial Droop

 • Arm Weakness

 • Speech

 • Time

4. What should I do if I think someone is having a stroke?

Answer: During a stroke, bystanders should know the signs and act in time. If you believe someone is having a stroke — if the person loses the ability to speak, to move an arm or leg on one side, or experiences facial paralysis on one side — call 108 immediately. Stroke is a medical emergency. Immediate stroke treatment may save someone's life and enhance his or her chances for successful rehabilitation and recovery.

5. Why is it important to get to the hospital as quickly as possible?

Answer: Ischemic strokes, the most common strokes, can be treated with a drug called tPA, which dissolves artery-obstructing clots. The window of opportunity to use tPA to treat stroke patients is 4.5 hrs, so the sooner stroke patients can get to the hospital to be evaluated and receive treatment, the better their outcome. Stroke patients who receive tPA for their stroke symptoms are at least 30 percent more likely to recover from their stroke with less disability after three months than those who present to the hospital after three hours and are thus unable to receive tPA

6. What are risk factors for stroke?

Answer: There are things you can do to lower your risk of stroke.

 • High blood pressure.

 • Heart disease with atrial fibrillation.

 • Smoking

 • Diabetes

 • High cholesterol

 • Family history of stroke.

7. What is the treatment for stroke?

Answer: Generally, there are three treatment stages for stroke:

 • Prevention

 • Therapy immediately after the stroke,

 • Post-stroke rehabilitation.

8. What is the prognosis for stroke?

Answer: . A common disability that results from stroke is

 • complete paralysis on one side of the body, called hemiplegia

 • one-sided weakness or hemiparesis.

 • Problems with thinking, awareness, attention, learning, judgment, and memory.

 • Understanding or forming speech.

 • Emotional problems; controlling their emotions or may express inappropriate emotions,

 • Depression.

9. What can be done to reduce the risk of stroke?

Answer: To reduce your risk of stroke,

 • Monitor your blood pressure,

 • Track your cholesterol level & BSL , Stop smoking, Exercise regularly,

ब्रेन स्ट्रोक (पक्षाघात) आणि काही नेहमी पडणारे प्रश्न

१. प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) म्हणजे काय?

उत्तर: स्ट्रोकचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत: पक्षाघात ( Ischemic Stroke) म्हणजेच मेंदूला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा निर्माण होणे, आणि मेंदूतील रक्तस्त्राव (Hemorrhagic Stroke)- मेंदू आणि त्याचा आजूबाजूला रक्तस्त्राव होणे. पक्षाघातमध्ये रक्ताची गुठळी एखाद्या मेंदूच्या रक्त वाहिनीला बंद किंवा प्लग करते. साधारण ८० % स्ट्रोक हे ह्या प्रकारात मोडतात. मेंदूतील रक्तस्त्राव प्रकारात मेंदूमधील रक्त वाहिनी फुटून मेंदूत रक्तस्त्राव होतो. २०% स्ट्रोक या प्रकारात मोडतात.

२. प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) येतो म्हणजे नक्की काय होते?

उत्तर: स्ट्रोक (पक्षाघात) येतो तेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाचा रक्त पुरवठा अचानक बंद होतो. मेंदूच्या पेशी रक्त आणि प्राणवायूच्या अभावी मरण पावतात. अचानक रक्तस्त्राव झाल्यास पण मेंदूच्या पेशी जिवंत राहू शकत नाहीत.

३. प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) ची लक्षणे काय आहेत?

उत्तर: शरीराचा एका बाजूला अचानक येणारा शिथिलपणा, गोंधळून जाणे, बोलता ना येणे, बोललेले न समजणे, एक किंवा दोन्ही डोळ्यांना नीट न दिसणे, चालताना अडखळणे, चक्कर येणे किंवा तोल सांभाळता न येणे, अचानकपणे खूप जास्त डोके दुखणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात. स्ट्रोक (पक्षाघात) ची लक्षणे ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे F.A.S.T

 • Facial Droop (चेहरा वेडावाकडा होणे)

 • Arm Weakness (अचानक जाणवणारा हातापायातील अशक्तपणा)

 • Speech (अडखळत बोलणे)

 • Time (स्थलकालाचे भान न राहणे)

४. प्रश्न: जर मला कोणामध्ये स्ट्रोक (पक्षाघात) ची लक्षणे दिसून अली तर मी काय करू शकतो/ शकते?

उत्तर: एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक (पक्षाघात) येत असेल आणि तुम्ही तिथे असाल तर ही लक्षणे पटकन ओळखून पटापट पुढील कार्य करणे गरजेचे आहे. कोणी जर बोलू शकत नसेल, हात किंवा पाय हलवू शकत नसेल अथवा चेहरा एका बाजूला वेडावाकडा करत असेल तर त्वरित १०८ नंबर वर फोन करणे अतिशय महत्वाचे आहे. स्ट्रोक (पक्षाघात) ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि त्यात तज्ञ डॉक्टरची सेवा मिळणे खूप महत्वाचे आहे. तातडीची सेवा मिळाल्यास एखाद्याचा जीव तर वाचू शकतोच, तसेच त्याचे पुढील आयुष्य पण लवकरात लवकर पूर्वीसारखे होऊ शकते.

५. प्रश्न: लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये पोचणे किती महत्वाचे आहे?

उत्तर: पक्षाघातावर एक TPA नावाचे औषध खूप उपयोगी पडते. पण हे औषध रुग्णास देण्याचा कालावधी केवळ ४ ते ४.५ तास इतका आहे. म्हणजेच जितक्या लवकर रुग्ण हॉस्पिटल मध्ये पोचून त्यावर इलाज सुरु होईल तितकी त्याची पूर्ण बरे होण्याची शक्यता जास्त आहे. ज्या रुग्णांना स्ट्रोक (पक्षाघात) आल्यापासून ४.५ तासात TPA दिले जाते त्यांची प्रकृती सुधारण्याची शक्यता , इतर रुग्ण जे लवकर हॉस्पिटलमध्ये पोचू शकत नाहीत त्यांच्यापेक्षा ३०% अधिक असते.

६ प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) येण्याचे धोके कशामुळे संभवतात?

उत्तर: (पक्षाघात) येण्याची शक्यता ह्या कारणांमुळे वाढू शकते

 • उच्च रक्त दाब

 • हृदय रोग आणि रक्तवाहिन्यांचे काठीण्य

 • धूम्रपान

 • मधुमेह

 • वाढलेली कोलेस्ट्रॉल पातळी

 • आनुवंशिकतेने आलेला स्ट्रोकचा धोका

७. प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) वर मुख्य उपचार कोणते आहेत?

उत्तर: साधारणपणे स्ट्रोक (पक्षाघात) चा उपचार तीन पातळ्यांवर होतो

 • स्ट्रोक (पक्षाघात) टाळणे (प्रतिबंधात्मक उपचार)

 • अटॅक आल्यास तातडीने उपचार सुरु करणे

 • स्ट्रोक (पक्षाघात) नंतरचे पुनर्वसन

८ प्रश्न: स्ट्रोक (पक्षाघात) नंतर काय होऊ शकते?

उत्तर: स्ट्रोक(पक्षाघात) नंतर सर्वात जास्त आढळून येणारी परिस्थिती

 • शरीराच्या एक बाजू पूर्ण पणे निकामी होणे - हेमिप्लेजिया (लकवा)

 • एका बाजूला खूप थकवा किंवा शिथिलता येणे - हेमिपॅरॅसिस

 • निर्णय क्षमता खालावणे तसेच स्मृती,एकाग्रता आणि आकलन क्षमता कमी होणे.

 • बोलता न येणे अथवा बोललेले न समजणे

 • भावनिक उद्रेक किंवा चुकीचे वर्तन

 • उदासीनता किंवा निराशा

९ प्रश्न: स्ट्रोक(पक्षाघात) चा धोका कसा कमी करता येईल?

उत्तर: स्ट्रोक (पक्षाघात) चा धोका कमी करण्यासाठी हे करू शकता

 • नियमितपणे रक्तदाब तपासणे

 • कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवणे,

 • धूम्रपान टाळणे

 • नियमित व्यायाम करणे

An emerging workplace with expanding units, NTU provides the best possible patient care with a fresh environment and with equal amount of energy and money vested by our team.

Read More

Ruby Hall Clinic,

40 Sassoon Road, 1st Floor, Sanghvi Block, Pune 411001

Maharashtra, India

NTU Coordinator
Mobile: 8390304543

In Case of Emergency:
Phone No: 020-66455100
Extn: 5519/5506

ntu@rubyhall.com